Facebook SDK



प्रयत्न करताना चुका होतातच...
चुकांमधून येतो तो अनुभव आणि...
अनुभवातून मिळते ते यश..!

स्वतः ची सावली निर्माण करण्यासाठी
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा
प्रयत्न करने होय.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही.


आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!

एक वेळेस दहा काम करण्यापेक्षा
दहा वेळेस एकच काम करा
यश नक्कीच तुमच्या हातात येईल.



जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे
असे नाही तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त
चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.




सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे जळावे लागते.




असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.

तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,

त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.




माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.




नशिबावर नाही तर मेहनीतीवर विश्वास ठेवा.




तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात

तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही

गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा

दोष असेल.




Motivational quotes on Life in Marathi






स्वप्न मोफतच असतात,

फक्त त्यांचा पाठलाग करतांना

आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.




आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.




एक स्वप्न तुटून चकनाचूर झाल्यानंतरही

दुसरे स्वप्न बघण्याच्या धाडसाला

आयुष्य म्हणतात.




एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआप आदरानं झुकतात.




पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा

कारण जिंकलात तर,

स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…

आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.




Marathi Inspirational Quotes on Dream






स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,

स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.




कारणं खूप भेटतील स्वप्न पूर्ण न करण्याची

पण ती गेलेली वेळ परत नाही मिळणार.




महत्व वेगाला नाही तर...

आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला

चाललोय याला असत.




आत्मविश्वासाचा अभाव

हेच अपयशाचे खरे कारण आहे.




हरला म्हणून लाजू नका

जिंकलात म्हणून माजू नका.




Motivational Quotes in marathi with images






माणसाला स्वत:चा “photo”

का काढायला वेळ लागत नाही,

पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.




भीती ही भावना नसून

अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.




आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना

सामोरे गेल्याशिवाय चांगल्या

दिवसांची किंमत कळत नाही.




प्रेरणादायी सुविचार मराठी मध्ये




ध्येय उंच असले की ,

झेप देखील उंचच घ्यावी लागते.




काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात

करून दाखवायच्या असतात.




Marathi Inspirational Quotes on Life






जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,

स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.




कोणीही पाहत नसताना आपले काम

जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.




जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….




कासवाच्या गतीने का होईना

पण रोज थोडी थोडी प्रगती करा,

खूप ससे येतील आडवे,

बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.




कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.




Motivational Thoughts in Marathi






ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.




सुंदर चरित्र आणि कर्तव्य

कुणाकडूनच उसने मिळत नाही.

ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.




जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते

तीच वेळ असते

नवीन काहीतरी सुरु करण्याची




पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो,

त्याप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट सापडते.




चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,

पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी

स्वतःलाच चालावे लागते.




मित्रांनो जर तुम्हाला हा मराठी प्रेरणादायी सुविचारांचा संग्रह आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि आम्हाला फेसबुक व इंस्टाग्राम वर फॉलो करा.




धन्यवाद...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने