Facebook SDK

मैत्री मराठी स्टेटस | Friendship Quotes and Status in Marathi


मैत्रीचं नातं हे सर्व नात्यांपेक्षा अलौकिक असत ज्याच्यासोबत आपण प्रत्येक गोष्ट शेयर करतो, हसणे, रडणे दोन्ही गोष्टी करतो. एकमेकांच्या सुखादुःखात सहभागी होतो. मैत्रीचे नाते हे आपल्या जीवनातील एक खूप महत्त्वाचे नाते असते. काही गोष्टी आपण आपल्या परिवारासोबत शेयर करू शकत नाहीत पण त्या गोष्टी फक्त मित्रासोबत शेयर करतो.



आजच्या लेखात आपण मैत्री मराठी स्टेटस | Friendship Quotes and Status in Marathi तसेच काही मैत्री कविता, मराठी मैत्री शायरी, मराठी मैत्री स्टेटस पाहणार आहोत. जे तुम्ही Marathi Friendship Quotes for whatsapp, Friendship Status in Marathi, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.


मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास, मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट. 'मैत्री' या नात्याची जेवढी प्रशंसा करावी तेव्हढी कमीच आहे. चला तर मग पाहूया 'Marathi Friendship Quotes & Status' चा अप्रतिम संग्रह.


Friendship Quotes in Marathi

Friendship Quotes in Marathi

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो.
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

Marathi Friendship Kavita

Marathi Friendship Kavita

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी...
मैत्री असावी तर रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी.

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.

मैत्रीची वाट जरा कठिण आहे
पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा
एक मैत्रीच तर प्राण आहे…

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा.

Friendship WhatsApp Status in Marathi
Friendship WhatsApp Status in Marathi

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात...
ती आपोआप गुंफली जातात...
मनाच्या ईवल्याश्या कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात...
यालाच तर मैञी म्हणतात...


मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा...

दोस्ती पैशासारखी आहे, घेणे सोप्पं आहे पण,
तिला टिकवणं अवघड आहे.

Best Friend Quotes in Marathi 
Best Friend Quotes in Marathi

मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.


आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया.
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया.

Friendship Day Quotes in Marathi
Friendship Day Quotes in Marathi

देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमव..
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव.


सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो ….
पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र.

मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा,
मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब,
मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू,
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.

Marathi Friendship Message

Marathi Friendship Message

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

चांगल्या काळात हात धरणे,
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील
हात न सोडणे म्हणजे मैत्री.

कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही.

Shorts Friendship Quotes in Marathi

Shorts Friendship Quotes in Marathi

"मैत्री" असा खेळ आहे
जो दोघांनीही खेळायचा असतो.
एक बाद झाला तरी
दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो.


बोलता बोलता काही जण रुसुन जातात...
चालता चालता हातातले हात सुटून जातात...
म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते...
इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात...


मैत्री असावी मना मनाची, 

मैत्री असावी जन्मो जन्माची, 

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची 

अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.


मित्रांनो जर तुम्हाला Friendship Status in Marathi  संग्रह आवडला असेल तर तुमचा मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुमच्याकडे अजून friendship messages किंवा marathi friendship images असतील तर आम्हाला कमेंट करा. आम्ही अश्या प्रकारचे मराठी सुविचार आणि स्टेटस नेहमी शेअर करत असतो. आमच्यासोबत अपडेट राहण्यासाठी आम्हाला instragram, Facebook आणि Pinterest वर फॉलो करा.


धन्यवाद...


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने