Facebook SDK

आनंदी मराठी सुविचार | Marathi Quotes On Happiness


नमस्कार मित्रांनो या ब्लॉग वर आपले स्वागत आहे. येथे तुम्हाला दररोज नवनवीन मराठी सुविचार Marathi Good Thoughts वाचण्यास मिळतील. आनंद हे एक असे औषध आहे जे आपल्याला डोंगराएवढे दुःख विसरण्याची ताकत देते. आपले आयुष्य हे अनमोल आहे, ते दुखी कष्टी होऊन वाया घालवू नका. नेहमी आनंदित राहणं ही एक कला आहे ती आत्मसात करा.

आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटाना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये जीवनात आनंदी राहणे जरुरी असते. आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले आनंदी मराठी सुविचार | Marathi Quotes On Happiness घेऊन आलो आहोत. त्यांना वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यातील ताण काही प्रमाणात कमी करू शकता.


आपण मराठी सुविचार, Marathi Quotes, आनंदी सुविचार, Whatsapp Marathi Status, Facebook Marathi Status, Marathi Suvichar, marathi status, मराठी आनंदी सुविचार, Happiness quotes in Marathi यांचा वापर करून आपल्या मित्रांना आणि  जवळच्या कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडिया वर शेअर करू शकता. चला तर मग पाहूया मराठी आनंदी सुविचारांचा अप्रतिम संग्रह.


Marathi Quotes on Happiness

स्वभावात प्रेम, चेहर्‍यावर हास्य, आणि मनात आनंद जपा आयुष्य खूप सुंदर होईल.


सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू.


जीवनात कधीच दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नसतात...

एक म्हणजे अन्नाचा कण,

आणि दुसरी म्हणजे आनंदाचा क्षण.


समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे.


काही वेळा तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याचा स्रोत असतो,पण बऱ्याचदा हसण्यासाठी आनंदी होणं गरजेचं असतं.


Happy Quotes in Marathi

इतरांच्या चेहर्‍यावरील आनंदाच्या पाठीमागच कारणं होण, या सारखं पुण्य जगात कुठलच नाही.


जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त वाढेल.


आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची सोबत असू द्या! परिस्थिती तुमच्या अनुकूल असेलच असे नाही पण आनंदी स्वभावाने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनवू शकता.


आनंद ही चेहऱ्यावरून नव्हे तर मनातून प्रकट होणारी भावना आहे, म्हणून आनंद हा मनातून निर्माण होवू द्या.


पैशाने आनंद मिळत नाही, आनंद हा स्वभावात असायला हवा, ज्याने आपल्याला आणि दुसऱ्यांनाही आनंद मिळेल .


Happiness Status in Marathi

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो

पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.


आनंद नेहमी चंदना सारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो.


मनामध्ये आनंद जपाल तर जीवनातला प्रत्येक क्षण उत्सवासारखा साजरी कराल.


जितके आनंदी राहाल, तितके यशस्वी व्हाल.


माणसानं नेहमी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत राहील पाहिजे.


Marathi Happy Status

दु:ख मोजण्याच्या नादात आपण जीवनातले आनंदाचे क्षण विसरून जातो.


आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा- तुम्ही इतरांसाठी काय चांगला केल ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल ते.


चेहर्‍यावर इतका आनंद असू द्या की आरश्यात पाहिल्यावर आरसा सुद्धा म्हटला पाहिजे तू तर ऑलरेडीच सुंदर दिसतोय तुला मेकअप ची काय गरज आहे.


आनंद वाटल्याने कधीच कमी होत नसतो.


आनंद हा सर्वत्र फुकटच मिळत असतो तेव्हा तो अजिबात सोडू नका. मित्रांनो जर तुम्हाला हा मराठी सुविचारांचा संग्रह आवडला असेल तर इतरांसोबत जरूर शेअर करा आणि आमच्यासोबत अपडेट राहण्यासाठी आम्हाला फेसबुक व इंस्टाग्राम आणि Pinterest वर फॉलो करा.


धन्यवाद...





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने